चीनचा चढता आलेख व भारतावर होणारे त्याचे संभाव्य परिणाम

सन १९४९ च्या ऑक्टोबर मध्ये चँग कै शेक यांची राजवट उलथवून चीनमध्ये माओ त्से तुंग यांनी साम्यवादी सरकार स्थापन करून सांस्कृतिक क्रांती घडवून आणली… यानंतरच्या मागील सहा देशाकामध्ये चीनची प्रगती व त्याचा चढता आलेख हा अभ्यासाचा गहन विषय आहे. यामध्ये चीनचा राजनैतिक व लष्करी दबदबा व आर्थिक समृद्धी हे भिन्न अभ्यासाचे विषय असले तरीही ते राष्ट्रीय पुनरुत्थानाच्या नाण्याच्या ते दोन बाजू दर्शवितात.

प्रथम त्यांच्या राजनैतिक स्थित्यंतराचे विश्लेषण करू. माओ व त्यांचे पंतप्रधान चौ एन लाय यांनी एकीकडे भारताचे पंतप्रधान पंडित नेहरू यांचे बरोबर पंचशील करार केला, तर दुसरी कडे तिबेटवर हक्क सांगून तो संपूर्ण प्रदेश गिळंकृत केला. तेथील शांतता भंग पावली. दलाई लामांबरोबर कित्येक तिबेटी लोकं भारताच्या आश्रयास आले. त्यानंतर आजतागायत तिबेटी जनतेचे शांतता वादी आंदोलन चीन दडपतो आहे एवढ्यावरच न थांबता चीनने, मँकमोहन रेषा मान्य करण्यास नकार देऊन भारतावर हल्ला चढवला. चीनने अरुणाचल प्रदेश (आधीचा नेफा) तसेच इतरत्र भारतीय भू-भागावर हक्क सांगितला. १९६२ च्या या युद्धापासून आजही चीनकडे ३८,९०० कि.मी. चा भारतीय भूभाग आहे. या व्यतिरिक्त पाकिस्तानने चीनबरोबर १९६३ साली करार करून पाकव्याप्त काश्मीरमधील ५,२०० चौ.कि.मी. चा अक्साई चीनचा भूभाग चीनला देऊन टाकला. तरीही चीन भारताबरोबर अरुणाचल प्रदेशमधील ९६,००० चौ.कि.मी. च्या भूभागावर दावा करतो आहे. येथील तवांगचा बौद्ध मठ, जो तिबेटी बौद्ध जनतेस ल्हासा येथील बौद्ध मठा नंतर दुसरा महत्वाचा व पवित्र मठ आहे त्यावर चीन आपला हक्क सांगतो आहे.

चीन बरोबरील वादाला गांभीर्यपूर्वक घेण्याचे महत्वाचे कारण हे कि चीन आपला सर्वात मोठा शेजारी देश आहे. तद्वतच हे जगातील सर्वाधील लोकसंख्या असलेले राष्ट्र आहे. आकारमानाने व भौगोलिक दृष्ट्या हा मोठा व महत्वाचा आशियाई देश आहे. या सर्वा बरोबरच महत्वाचे म्हणजे चीन हा भारताप्रमाणेच पुरातन संस्कृती असलेला, साधन संपत्तीने समृद्ध देश आहे. त्याचमुळे भारत-चीन संबंध हे वेगळ्या वळणावरचे ठरतात. १९६२ च्या भारत-चीन युद्धा नंतर दोनच वर्षांनी चीनने आण्विक स्पोट केला. कदाचित याचमुळे काही वर्षांनी अमेरिकेने राष्ट्रपती निक्सन यांच्या काळात चीशी जवळचे संबंध सुस्थापित केलेत; जे ‘पिंग-पाँग डीप्लोमासी’  या नावाने प्रसिध्द झालेत. शीतयुद्धाच्या कालावधीत चीनचा अमेरिकेला रशिया विरुद्ध चांगलाच उपयोग झाला. त्यामुळे चीनचा लष्करी दबदबा वाढतच गेला. त्यांनी एका पाठोपाठ एक विवादास्पद भूभाग ताब्यात घेतले. मकाऊ, हाँगकाँग नंतर आता तैवान वरही हक्क सांगत आहेत. नंतर सत्तेवर येणाऱ्या डेंग यांनी आणखीनच आक्रमकपणे विस्तार वादी धोरण राबवले. आपली अमेरिका घेतीनंतर त्वरित चीनने व्हियेतनाम वर हल्ला केला. कंबोडियातील हुकुमशाह पोल पॉट याला संयुक्त राष्ट्रसंघात पाठींबा दिला. अमेरिके  बरोबरच चीननेही अफगाणिस्तान मधील मुजाहिद्दीन बंडखोरांना पाठींबा दिलेला होता. भारताशी होणारी संभाव्य स्पर्धा व प्रगती लक्षात घेऊन चीनने सुरवातीपासूनच पाकिस्तानला मदत केलेली आढळते. १९६५ चा भारत विरुद्धच्या युद्धात पाकिस्तानला पाठींबा देणारा ची

Related posts

Leave a Comment