आपली लोकशाही व्यवस्था प्रगल्भ आणि सुदृढ असल्याने भारतात राजकीय स्थिरतेचा अनुभव येतो. सध्याचे मोदी सरकार विकासात्मक असल्याने, भारताचा जीडीपी वाढीचा दर जगात सर्वाधिक आहे. यामुळे लवकरच आपण जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असू, असा विश्वास आहे. मोदी सरकारला २०२४ मध्ये जनतेचा, तिसऱ्यांदा ऐतिहासिक कौल मिळाल्याने अर्थव्यवस्था वाढीचा वेग आश्वासक आहे. यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या आर्थिक प्रगतीकडे लागलेले आहे. पण अशातच आपल्या शेजारी देशांमध्ये एक अस्वस्थता आहे – राजकीय तसेच सामाजिक दृष्ट्या. याचमुळे या सर्वांचा एकत्रित परिणाम भारताच्या वाढीवर होणे स्वाभाविक आहे. पाकिस्तान आणि चीन: पारंपरिक विरोधक पाकिस्तान आणि चीन…
