2024 महाराष्ट्राच्या निवडणुकीचा अन्वयार्थ

ऐतिहासिक पार्श्वभूमी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून, आजपर्यंतच्या सर्वच निवडणु‌कांमध्ये, या निवडणुकीचे महत्व आलेल्या निकालामुळे, वेगळेपणाने अधोरेखित होते. त्यासाठी काही गोष्टी विशेषत्वाने नमूद कराव्या लागतील. महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या राजकारणाचा आणि बरोबरीने समाजकारणाचा विचार करताना काही गोष्टी ठळकपणे लक्षात येतात. एकतर असे आहे की महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून साधारणपणे सुरुवातीची पाच दशके महाराष्ट्रावर काँग्रेसचे एकछत्री राज्य होते. अपवाद होता फक्त १९७८ पासून च्या दीड -पावणेदोन वर्षांचा. तेंव्हा काँग्रेसमधून फुटुन पुलोद ची स्थापना करणारे शरद पवार राज्याचे मुखामंत्री झाले. त्यानंतर फक्त १९९५ पासून, पुढील साडेचार वर्षे, प्रथमतः काँग्रेसेतर सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले. भाजपचा उदय…

१६ वी लोकसभा : अभूतपूर्व निवडणूक

साल २०१४ – महिना एप्रिल आणि मे. भारतासारख्या खंडप्राय देशातील सार्वत्रिक निवडणुका. मागच्या वर्षापर्यंत कुणीही भाकीत केलेला नव्हत की या सर्वार्थाने ऐतिहासिक तर् ठरतीलाच परंतु कित्येक बाबतीत देशाचेच नाव्ये तर् आंतरराष्ट्रीय राजकारणाचे निकष आणि आराखडे पण ठरवायला आणि बदलायला कारणीभूत ठरतील. दोन महिन्यांपूर्वीच मला स्वतःला श्री. मोदींच्या नेतृत्वा खालील भारतीय जनता पक्षाला घाघावीत यश मिळेल असा अंदाज पूर्णांशाने होता. परंतु ज्या प्रकारे आणि ज्या पद्धतीने ये यश मिळाले, ते पुढील कित्येक महिने देशाच्याच नव्हे तर् जागतिक पटलावर अभ्यासले व चर्चिले जाईल. सोसाट्याचा वर सुटावा आस नरेंद्र मोदींचा देशभर झंझावाती प्रचार…