१६ मे रोजी निवडणुकांचा निकाल बाहेर आला. त्याच बरोबर निकालाबद्दल आनंद, आश्चर्य, उत्साह, दुःख, राग, रोष याचबरोबर त्याचे मंथन म्हणजे एक प्रकारे चर्वितचर्वण सुरु झाले. अर्थात हा निकाल सर्वार्थाने ऐतिहासिक असाच आहे. त्यामुळे होणारे बदल हे पुढील कित्येक वर्षे भारताचे राजकीय भूगोल व आर्थिक घडी बदलण्यास कारणीभूत ठरतील. भारत हि एक उगवती राजकीय व आर्थिक महासत्ता असल्याने साहजिकच त्याचे वैश्विक परिणाम सुद्धा होतील. साधारणतः आपल्याकडे निवडणुकांमधून मिळणाऱ्या साध्या बहुमाताद्वारे येणारे सरकार ठरत असते. त्यामुळे मतदान आणि मतदार यांचे गुणोत्तर फार महत्वाचे ठरते. अतिशय गमतीचा भाग हा आहे कि आज पर्यंत…
