महाराष्ट्र देशाचे ‘ग्रोथ इंजिन’

  महाराष्ट्र हे देशातील सर्वात प्रगत राज्यांपैकी एक असून, ‘ग्रोथ इंजिन’ म्हणून ओळखले जाते. २०२४ मध्ये स्थापन झालेल्या महायुती सरकारकडून महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे. या लेखामध्ये महाराष्ट्राच्या आर्थिक, सामाजिक, आणि पायाभूत प्रगतीचा मागोवा घेतला आहे.   महायुती सरकारचे स्थापन देशातील प्रगत राज्य आणि भारताचे महत्त्वाचे ‘ग्रोथ इंजिन’ असणाऱ्या महाराष्ट्रात या ५ डिसेंबर २०२४ ला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार सत्तारूढ झाले. त्यांच्याबरोबरच एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे सुद्धा उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. राजकारणातील एकसंघतेचा आदर्श या सरकारचे वैशिष्ट्य असे आहे की ज्याप्रमाणे आपण अठरा पगड जातींच्या…

2024 महाराष्ट्राच्या निवडणुकीचा अन्वयार्थ

ऐतिहासिक पार्श्वभूमी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून, आजपर्यंतच्या सर्वच निवडणु‌कांमध्ये, या निवडणुकीचे महत्व आलेल्या निकालामुळे, वेगळेपणाने अधोरेखित होते. त्यासाठी काही गोष्टी विशेषत्वाने नमूद कराव्या लागतील. महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या राजकारणाचा आणि बरोबरीने समाजकारणाचा विचार करताना काही गोष्टी ठळकपणे लक्षात येतात. एकतर असे आहे की महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून साधारणपणे सुरुवातीची पाच दशके महाराष्ट्रावर काँग्रेसचे एकछत्री राज्य होते. अपवाद होता फक्त १९७८ पासून च्या दीड -पावणेदोन वर्षांचा. तेंव्हा काँग्रेसमधून फुटुन पुलोद ची स्थापना करणारे शरद पवार राज्याचे मुखामंत्री झाले. त्यानंतर फक्त १९९५ पासून, पुढील साडेचार वर्षे, प्रथमतः काँग्रेसेतर सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले. भाजपचा उदय…

१६ वी लोकसभा : अभूतपूर्व निवडणूक

साल २०१४ – महिना एप्रिल आणि मे. भारतासारख्या खंडप्राय देशातील सार्वत्रिक निवडणुका. मागच्या वर्षापर्यंत कुणीही भाकीत केलेला नव्हत की या सर्वार्थाने ऐतिहासिक तर् ठरतीलाच परंतु कित्येक बाबतीत देशाचेच नाव्ये तर् आंतरराष्ट्रीय राजकारणाचे निकष आणि आराखडे पण ठरवायला आणि बदलायला कारणीभूत ठरतील. दोन महिन्यांपूर्वीच मला स्वतःला श्री. मोदींच्या नेतृत्वा खालील भारतीय जनता पक्षाला घाघावीत यश मिळेल असा अंदाज पूर्णांशाने होता. परंतु ज्या प्रकारे आणि ज्या पद्धतीने ये यश मिळाले, ते पुढील कित्येक महिने देशाच्याच नव्हे तर् जागतिक पटलावर अभ्यासले व चर्चिले जाईल. सोसाट्याचा वर सुटावा आस नरेंद्र मोदींचा देशभर झंझावाती प्रचार…

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने – विधानसभा निवडणुकीचे पूर्वावलोकन

मुळातच लोकसभा निवडणुका वेगळ्या कारणासाठी लढवल्या जातात. त्यामध्ये राष्ट्रीय दृष्टिकोन हा केंद्रस्थानी असतो. म्हणजेच केंद्रातील सरकार देशाचे संरक्षण व देशाचा आर्थिक विकास कसा करणार या व इतर परिणामांद्वारे जनता आपले मत नोंदवते. राज्यामध्ये विधानसभा निवडणुकी दरम्यान मात्र निराळे मुद्दे महत्वाचे ठरू शकतात. अर्थातच प्रस्थापितांच्या विरोधी जनमताचा रेटा (anti-incumbency factor) हा मुद्दा प्रकर्षाने मोठा असतो. आपल्या संघराज्य पद्धतीप्रमाणे लोकसभा निवडणुकां इतकेच विधानसभा निवडणुकांनाही महत्व आहे. लोकसभा निवडणुकीने केंद्रसरकार बनते तर विधानसभा निवडणुकीने राज्यसरकार, अर्थातच परराष्ट्र, संरक्षण, अर्थ, दळणवळण अशी कानी महत्वाची खाती आणि विभाग सोडले तर राज्य सरकारकडे संपूर्णच खाती परंतु…

द्विपक्षीय / द्विधृविय पद्धतीचा उगम

अमेरिका आणि ब्रिटन या दोन लोकशाही राज्यपद्धती असणाऱ्या देशांमध्ये साधारणतः दोन मुख्य पक्षांमध्येच निवडणुका लढल्या जातात. सुदृढ आणि परिपक्व लोकशाहीचे ते एक लक्षण आहे. इंग्लंडमध्ये हुजूर पक्ष व मजूर पक्ष तसेच अमेरिकेमध्ये रिपब्लीकन पक्ष व डेमोक्रॅटिक पक्ष असे दोन महत्वाचे पक्ष आहेत. इतर अनेक युरोपियन देशांमध्ये साधारणतः अशाच प्रकारची पद्धत आहे. आपल्या लोकशाही राज्यपद्धतीमध्ये आपण इंग्लंड प्रमाणे सांसदीय लोकशाही राबवतो अमेरिकेसारखी अध्यक्षीय पद्धत नव्हे  (तेथे राष्ट्राध्यक्षांची निवड प्रत्यक्ष जनतेमार्फत होते.) साहजिकच व्यक्ती तितक्या प्रकृती या उक्ती प्रमाणे आपल्याकडे ढीगभर पक्ष अस्तित्वात होते व आहेत. सांसदीय लोकशाहीमध्ये मुख्यतः “सत्तारूढ पक्ष वा…