आपली लोकशाही व्यवस्था प्रगल्भ आणि सुदृढ असल्याने भारतात राजकीय स्थिरतेचा अनुभव येतो. सध्याचे मोदी सरकार विकासात्मक असल्याने, भारताचा जीडीपी वाढीचा दर जगात सर्वाधिक आहे. यामुळे लवकरच आपण जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असू, असा विश्वास आहे. मोदी सरकारला २०२४ मध्ये जनतेचा, तिसऱ्यांदा ऐतिहासिक कौल मिळाल्याने अर्थव्यवस्था वाढीचा वेग आश्वासक आहे. यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या आर्थिक प्रगतीकडे लागलेले आहे. पण अशातच आपल्या शेजारी देशांमध्ये एक अस्वस्थता आहे – राजकीय तसेच सामाजिक दृष्ट्या. याचमुळे या सर्वांचा एकत्रित परिणाम भारताच्या वाढीवर होणे स्वाभाविक आहे. पाकिस्तान आणि चीन: पारंपरिक विरोधक पाकिस्तान आणि चीन…
Category: आंतरराष्ट्रीय घडामोडी
इराक युद्ध, सद्दाम हुसैन आणि अमेरिका
३० डिसेंबर २००६ रोजी इराकच्या प्रमाण वेळे नुसार पहाटे माजी अध्यक्ष सद्दाम हुसैन यांना फासावर चढवण्यात आले आणि एक हुकुमशहा काळाच्या पडद्याआड गेला. मानवीय दृष्टिकोनातून या घटनेचे विश्लेषण केल्यानंतर क्लेशदायक बाबी नजरे समोर येतात. त्याच बरोबर आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या परिप्रेक्ष्यातून हीच घटना एक दीर्घ आणि अतिशय गहन विषयवस्तू समोर आणते. पश्चिम आशिया आणि आखाती प्रदेश यातील एक महत्वाचा देश इराक खनिज तेलाने पर्यायाने पेट्रोडॉलरने समृद्ध व संपन्न देश. येथे १९७९ साली तत्कालीन अध्यक्ष अल-ब्रक यांना राजीनामा द्यावयास भाग पाडून सद्दाम हुसेन हे क्रमांक २ चे नेते व तत्कालीन उपाध्यक्ष सत्तारूढ झाले.…
चीनचा चढता आलेख व भारतावर होणारे त्याचे संभाव्य परिणाम
सन १९४९ च्या ऑक्टोबर मध्ये चँग कै शेक यांची राजवट उलथवून चीनमध्ये माओ त्से तुंग यांनी साम्यवादी सरकार स्थापन करून सांस्कृतिक क्रांती घडवून आणली… यानंतरच्या मागील सहा देशाकामध्ये चीनची प्रगती व त्याचा चढता आलेख हा अभ्यासाचा गहन विषय आहे. यामध्ये चीनचा राजनैतिक व लष्करी दबदबा व आर्थिक समृद्धी हे भिन्न अभ्यासाचे विषय असले तरीही ते राष्ट्रीय पुनरुत्थानाच्या नाण्याच्या ते दोन बाजू दर्शवितात. प्रथम त्यांच्या राजनैतिक स्थित्यंतराचे विश्लेषण करू. माओ व त्यांचे पंतप्रधान चौ एन लाय यांनी एकीकडे भारताचे पंतप्रधान पंडित नेहरू यांचे बरोबर पंचशील करार केला, तर दुसरी कडे तिबेटवर…
प्रयोजित भारत-अमेरिका अणुकरार
चाणक्य मंडल परिवार (मासिक), पुणे / डिसेंबर २००६ (वर्षे दुसरे, अंक बारावा) / पान ११ व ३८ सन १९९० च्या सुरवातीस शीतयुद्ध संपले. सोव्हियत युनियनचे विघटन सुरु झाले. पर्यायाने अमेरिका हि एकमेव महासत्ता म्हणून स्थापित झाली. नव्वद च्या दशकामध्ये अमेरिकेची दादागिरी समस्त जगणे अनुभवली. कालांतराने त्यांचे वर्चस्व कमी-अधिक प्रमाणात सर्वांनीच मान्य केले. पर्यायाने भारतानेही शितयुद्धकालीन दुरावा संपवून, जसवंतसिंग परराष्ट्रमंत्री असताना नियोजनबद्ध रीतीने अमेरिकेशी जवळीक निर्माण केली. त्यानंतर पुढे येणाऱ्या प्रत्येक परराष्ट्रमंत्र्याने मुख्यतः सरकारने हा धोरणात्मक बदल अमलात आणला. ‘बदल’ हा शब्द वापरण्याचे कारण हे कि सोव्हियत युनियन अस्तित्वात असताना,…
