भारतीय रेल्वेची जडण-घडण

‘झुक्  ऽ झुक् ऽऽ झुक् झुक् आगीन गाडी,  धुरांच्या च्या रेषा हवेत काढी’ हे बालगीत आपल्या सगळ्यांच्या मनामनात अगदी पूर्णपणे ठसलेले आहे. समस्त मराठी जनांच्या भाव विश्वाची सुरुवात करणाऱ्या अनेक कविता व बालगीतां मध्ये कदाचित हे गीत अग्रस्थानी असेल. तत्समच त्यातील ‘आगीनगाडी’ सुद्धा सर्वांच्या आवडीचा व कुतूहलाचा विषय आहे. एकप्रकारे भारताची भौतिक प्रगती ही रेल्वे च्या बरोबरीने झालेली आहे; अर्थात हा एका वेगळ्या व मोठ्या लेखाचा विषय असू शकतो. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इंग्रजांच्या ज्या काही चांगल्या पाउलखुणा आपल्याला दिसतात, त्या मध्ये ‘रेल्वे’ ही ‘धरोहर’ कदाचित प्रथमस्थानी असेल. माझ्या लहानपणी यवतमाळ…

भारतीय रेल्वे : नव्या क्षितिजाकडे

तब्बल एक कोटी ऐंशी लाख लोकांना दररोज प्रवास घडवणाऱ्या व सुमारे २० लाख टन माल वाहून नेणाऱ्या भारतीय रेल्वेचे हंगामी अंदाजपत्रक १३ फेब्रुवारी २००९ रोजी संसदेत मांडण्यात आले. यावर्षी निवडणूक होणार असल्या कारणाने हंगामी अंदाजपत्रक सादर झाले. साधारण जून मध्ये सामान्य बजेटपूर्वी दोन दिवस अगोदर रेल्वेचे संपूर्ण अंदाजपत्रक सदर होईल. भारतीय रेल्वेचा पसारा हा प्रचंड मोठा आहे. टी जगातील सर्वात मोठी संघटना, कर्मचारी व अधिकारी यांच्या संख्येच्या दृष्टीनेच ठरते. तद्वतच लांबीच्या दृष्टीने जगातील चौथ्या क्रमांकाची रेल्वे आहे. (पहिली अमेरिकेची, दुसरी रशियन, तिसरी चीनची). सुमारे ६३,३२७ कि.मी. अंतरा मध्ये पसरलेल्या भारतीय…