अमित कुमार हे नाव भारतीय फिल्म संगीताच्या सुवर्णकाळाशी अतूटपणे जोडले गेले आहे. वडील किशोर कुमार यांच्या प्रभावळीत वाढलेल्या अमित कुमार यांनी स्वतःच्या आवाजाच्या वैशिष्ट्यांनी आणि भावस्पर्शी गाण्यांच्या सादरीकरणाने संगीतप्रेमींच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले. त्यांच्या सांगीतिक प्रवासाला बॉलिवूडच्या ‘गोल्डन एरा’मधील खास ओळख आहे. आज आपण त्यांच्या या अद्वितीय प्रवासाचा आढावा घेणार आहोत, ज्याने भारतीय फिल्म संगीताच्या परंपरेत नवा ठसा उमटवला. गीत-संगीत: शाश्वत सत्य ‘गाणं म्हणजेच गीत आणि बरोबरीने संगीत, हे शाश्वत असतं, आपणच अपूर्ण असतो’ असे मध्यंतरी कुठेतरी वाचनात आले होते. आता अमित कुमार यांच्या गायक म्हणून असणाऱ्या कारकिर्दीचा विचार…
Category: Entertainment
आमची अनन्या – कॅप्टन पी
बदलता प्रवास ‘हम लोग’ आणि ‘ बूनियाद’ या दूरदर्शनवरील सोप ओपेरांचा म्हणजे सिरीयलचा सुरू झालेला प्रवास आज फार वेगळ्या वळणावर येऊन ठेपला आहे. हल्लीच्या डिजिटल मीडियाच्या जमान्यात वेब सिरीज, ‘स्ट्रीमिंग लाईव्ह’ द्वारे प्रसारित होणारे कार्यक्रम ‘टॉक शो’, रियालिटी शो या बरोबरीने विविध भाषिक मालिकांचे स्थान कायम आहे. याचमुळे विविध चॅनेल्स आणि त्यावर चालणारे विविधरंगी कार्यक्रम यांची सदोदित भरमार होत असते. या सर्वांमध्ये दूरदर्शनची राष्ट्रीय वाहिनी आणि त्याचे मराठी अपत्य सह्याद्री वाहिनी आपले अढळ स्थान जनमानसात आजही रुजवून आहेत. याच सह्याद्री वाहिनीवर नवीन मालिका सुरू आहे ‘आमची अनन्या’… अनन्या: मुख्य पात्र…
