बहुआयामी वर्ष २०२४’

वर्ष २०२४ चा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण आढावा घेतल्यास अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डोनाल्ड जे. ट्रम्प यांचे चार वर्षानंतर पुन्हा एकदा निवडून येणे, सीरियामध्ये बशीर अल असद यांची राजवट उलथून पडणे, रशिया युक्रेनचे सुरू असलेले युद्ध, तसेच इसराइल हमास यांचे युद्ध, इराणी राष्ट्रपतींचा अपघातात किंवा घातपातात झालेला मृत्यू, या काही ठळक घडामोडी लक्षात येतात. फक्त भारताच्या दृष्टीने विचार केल्यास श्रीलंकेमध्ये शांततापूर्ण मार्गाने झालेले सत्तांतर आणि त्याचबरोबर बांगलादेशात झालेले सरकार विरोधी बंड आणि त्यामुळे झालेले सत्तांतर, या घटना महत्त्वाच्या आहेत.

वर्ष २०२४ ची सर्वात परिणामकारक आंतरराष्ट्रीय घटना ही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक होय. याचे महत्त्वाचे कारण असे आहे की, अमेरिका हा आर्थिक दृष्ट्या आणि लष्करी बळाचा विचार केल्यास जगातील सर्वात मोठा देश आहे . याबरोबरच अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना असलेले अमर्याद अधिकार ही सुद्धा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचे महत्त्व वाढवते. ढोबळमानाने अमेरिकेची अर्थव्यवस्था साधारण २९ ट्रिलियन डॉलरची आहे. त्यानंतर चीन ची अर्थव्यवस्था साधारण १५ ते १७ ट्रिलियन डॉलरची आज मितीस आहे.

भारताचा आज जगात पाचवा क्रमांक असून आपली अर्थव्यवस्था ही ३.६ ट्रिलियन डॉलर एवढी होती, हे सर्व आकडे बघितल्यावर अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा जागतिक प्रभाव सहजपणे लक्षात येतो. वैश्विक पातळीवर अमेरिकेच्या जीडीपी चा हिस्सा २६ टक्के एवढा आहे. लष्करी दृष्ट्या अमेरिका हा देश दुसऱ्या महायुद्धानंतर एक महाशक्ती म्हणून गणला गेलाय. सोवियत युनियनच्या पतना नंतर,१९९० नंतर तर अमेरिका हाच देश जगातील एकमेव महाशक्ती म्हणूनच गणला जातो. या सर्व पार्श्वभूमीवर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाचे महत्त्व लक्षात येते.

अमेरिकेचे ४७ वे राष्ट्रपती म्हणून डोनाल्ड जे ट्रम्प हे २०१६ नंतर परत एकदा निवडून आले. त्यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या भारतीय वंशाच्या महिला उमेदवार उपराष्ट्रपती कमला हरिस यांचा पराभव केला . आकडेवारी बघितल्यास ट्रम्प यांना ३१२ इलेकटोरल कॉलेज ची मते आणि हरिस यांना २२६ मते प्राप्त झाली तसे बघितल्यास ट्रम्प यांना साधारण सात कोटी, बहात्तर लाख, ९७ हजार ७२१ मते म्हणजेच ४९.९% मते मिळालीत तर हॅरीस यांना सात कोटी, पन्नास लाख, ०९,३३८ म्हणजेच ४८.४% मते मिळालीत इतर दोन उमेदवारांना साधारण अर्धा -अर्धा टक्के मते मिळालीत. याचबरोबर अमेरिकन काँग्रेस आणि सिनेट या दोन्हीमध्येही ट्रम्प यांच्या पक्षाचा मोठा विजय झाला . या प्रचंड विजयामुळेच २० जानेवारी २०२५, ला राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणारे ट्रम्प यांची कारकीर्द जगाच्या दृष्टीने फार महत्त्वाची ठरते.

बायडेन सरकारचा विचार करताना, ट्रम्प यांची कारकीर्द जागतिक शांततेच्या दृष्टीने आणि भारताच्याही दृष्टीने फायदेशीर ठरावी, ही अपेक्षा आहे. ट्रम्प यांची धोरणे ‘अमेरिका फर्स्ट’ या स्वरूपाची असल्याने, जगात जागोजागी नाक खूपसण्याची आधीच्या राष्ट्राध्यक्षा प्रमाणे त्यांची कृती नाही, तसेच इमीग्रेशनच्या मुद्द्यावर आणि चीन बरोबरच्या व्यापाराच्या मुद्द्यावर ते कठोरपणे पावले उचलतील ही अपेक्षा आहे . याचा भारताला फायदा संभवतो. तसं बघितल्यास एचवन बी विसासाठी त्यांचे २०१६ मधील विधान भारताला आशादायक ठरले होते. सध्या यासंबंधी परस्पर विरोधी बातम्या माध्यमांमध्ये येत आहेत, पण आपल्या दृष्टीने हा महत्त्वाचा मुद्दा नाही.

डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेतील, त्यानंतर कॅनडाच्या ट्रूडो सरकार विरुद्ध कठोर वागतील ही अपेक्षा आहे. त्यांची एवढ्यातील विधाने याची साक्ष देतात. तसेच पनामा कालव्यातील हक्क आणि नाटोच्या विस्तारा संदर्भातही ते आधीच्या सरकार पेक्षा वेगळी भूमिका घेण्याची चिन्हे आहेत, नुकतेच नाटोमध्ये स्वीडन आणि फिनलंड बहे दोन आर्टिक महासागरावरची युरोपियन राष्ट्रे सामील झालेत. त्याचबरोबर ट्रम्प प्रशासनात भारतीय वंशाच्या लोकांचा वरचष्मा असणार आहे . विवेक रामास्वामी हे यात आघाडीवरील नाव आहे. ही सुद्धा भारतासाठी जमेची बाजू आहे. तुलसी गब्बर्ड ही अमेरिकन हिंदू महिला सुद्धा भारताच्या बाजूने अमेरिकन प्रशासनात असेल.
नुकत्याच बांगलादेशात झालेल्या बंडामागे अमेरिकेतील बायडेन प्रशासनाचा हात असल्याचा आरोप होतो . ट्रम्प प्रशासनाच्या कारकिर्दीत अशा घटनांवर तोडगा निघण्याची आशा आहे.

त्याचबरोबर इलोन मस्क आणि मार्क झुकेरबर्ग यांच्यासारखे उद्योजक ट्रम्प सरकारच्या नीती धोरणांवर प्रभाव टाकतील असा सूर आहे, भारतासाठी ते योग्य असेल. रशिया युकरेन युद्धामध्ये अमेरिका उघडपणे युक्रेनच्या बाजूने आहे, तसेच आपल्याकडे पूर्वोत्तर राज्यांमध्ये कार्यरत असणारे चर्च आणि त्यांचे अनुयायी अप्रत्यक्षपणे अमेरिकन ‘डीप स्टेटचे’ हस्तक आहेत ट्रम्प यांच्या अध्यक्षपदी असल्यानंतर या मुद्द्यांवर समाधानकारक तोडगा निघण्याची आशा करता येईल.

 

 

या वर्षातील दुसरी ठळक घडामोड सीरियातील बशरवअल असद सरकारच्या पदच्युत होण्याकडे बघता येईल. सीरिया हा पश्चिम आशियातील महत्त्वाचा देश असल्या बरोबरच, जगातील अतिशय जुने आणि संपन्न राष्ट्र म्हणून गणला जातो. जुन्या मेसापोटेमिया, असीरिया या भागांचा १९४५ मध्ये सीरिया हा देश जन्माला आला. फ्रेंच राज्यकर्त्यांकडून स्वतंत्र झाल्यानंतर साधारण १९६३ पासूनच तेथे बाथ पक्षाचे राज्य होते, हा पक्ष असद कुटुंबीयांकडूनच चालवला जात होता. असद सरकारचे उलथुन पडणे आणि राष्ट्रपती बशीरअल असडावयांचे रशियामध्ये परागंदा होणे, ही या देशाच्या आणि जगाच्या ही दृष्टीने मोठी घटना आहे. असद सजावटीला रशिया आणि इराणचा उघड उघड पाठिंबा होता हिजबोलला ही संघटना देखील असद सरकारला बळ पुरवीत होती बशरअल असद यांचे पदच्युत होण्याने आणि लोकशाहीवादी विरोधकांचे सरकार सत्तेवर येण्याने मोठी भूराजकीय परिस्थिती तेथे तयार झाली आहे. सीरियाची राजधानी दमास्कस हे जगातील सर्वात जुने ज्ञात शहर आणि सर्वात जुनी राजधानी आहे साधारण ख्रिस्तपूर्व ३००० पासूनचा त्याला इतिहास आहे.

सिरीयाला दहा हजार वर्षापासून चा इतिहास आहे शेती आणि जनावरांचे पालन हा व्यवसाय हजारो वर्षांपूर्वी सीरियामध्येच जन्माला आल्याचे दाखले आहेत . या अर्थाने सीरियातील घडामोडी महत्त्वाच्या ठरतात.

 

हे वर्ष जगभरातील सरकारांच्या दृष्टीनेही निवडणुकीचे वर्ष ठरले. भारत आणि अमेरिकेबरोबरच इतर साठ देशांमध्ये यावर्षी निवडणुका झाल्या. त्यात फ्रान्स आणि इंग्लंडचा सुद्धा समावेश होतो. फ्रान्समधील इमॅन्युअल मॅक्रोन सरकार आणि इंग्लंडचे रिषी सूनक यांचे सरकार जाणे हे भारतासाठी दुर्दैवाचे ठरले .इस्रायल आणि हमास यांचे युद्ध ही सुद्धा या वर्षातील महत्त्वाची घडामोड ठरली, या युद्धाने हमासचा निश्चित असणारा पराभव, या भागातील दहशतवादाचा पराभव ठरेल. भारताच्या दृष्टीने यावर्षी झालेल्या ब्रिक्स देशांचे संमेलन ,जी ट्वेंटी देशांचे संमेलन, एस सी ओ समिट, इटलीमध्ये जून मध्ये झालेले जी८ देशांचे संमेलन ज्यात भारतालाही आमंत्रण होते, हे सर्व संमेलन महत्त्वाचे ठरलेत.

 

जाता जाता भारतीय पंतप्रधानांना कुवैत सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान दिला जाणे, हे महत्त्वाचे ठरले . आतापर्यंत जवळपास वीस देशांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान दिला आहे .हा एक प्रकारे भारताचा बहुमान आहे. भारताचे महत्त्व वैश्विक स्तरावर वाढण्याची ही एक प्रकारे नांदी आहे. पंतप्रधान मोदी जगाच्या पाठीवर जिथे जिथे जातात तिथे तिथे ‘फिनटेकवर’ बोलतात, म्हणजे फायनान्स आणि टेक्नॉलॉजी, एक प्रकारे विकसित भारताच्या दृष्टीने ते जगभरात जातात. भारताचे युपीआय, ‘मेक इन इंडिया’या कार्यक्रमांनाच ते जगभर चालना देतात वर्ष २०४७ पर्यंत विकसित भारताची मुहूर्तमेढ रोवायला अशा रीतीने हे २०२४ वर्ष बहुआयामी ठरले.

Related posts

Leave a Comment