ऐतिहासिक पार्श्वभूमी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून, आजपर्यंतच्या सर्वच निवडणुकांमध्ये, या निवडणुकीचे महत्व आलेल्या निकालामुळे, वेगळेपणाने अधोरेखित होते. त्यासाठी काही गोष्टी विशेषत्वाने नमूद कराव्या लागतील. महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या राजकारणाचा आणि बरोबरीने समाजकारणाचा विचार करताना काही गोष्टी ठळकपणे लक्षात येतात. एकतर असे आहे की महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून साधारणपणे सुरुवातीची पाच दशके महाराष्ट्रावर काँग्रेसचे एकछत्री राज्य होते. अपवाद होता फक्त १९७८ पासून च्या दीड -पावणेदोन वर्षांचा. तेंव्हा काँग्रेसमधून फुटुन पुलोद ची स्थापना करणारे शरद पवार राज्याचे मुखामंत्री झाले. त्यानंतर फक्त १९९५ पासून, पुढील साडेचार वर्षे, प्रथमतः काँग्रेसेतर सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले. भाजपचा उदय…
Author: Pritish Pandit
Indian Railway and Me
Pritish pandit
https://pritishpandit.in/
