महाराष्ट्र देशाचे ‘ग्रोथ इंजिन’

 

महाराष्ट्र हे देशातील सर्वात प्रगत राज्यांपैकी एक असून, ‘ग्रोथ इंजिन’ म्हणून ओळखले जाते. २०२४ मध्ये स्थापन झालेल्या महायुती सरकारकडून महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे. या लेखामध्ये महाराष्ट्राच्या आर्थिक, सामाजिक, आणि पायाभूत प्रगतीचा मागोवा घेतला आहे.

 

महायुती सरकारचे स्थापन

देशातील प्रगत राज्य आणि भारताचे महत्त्वाचे ‘ग्रोथ इंजिन’ असणाऱ्या महाराष्ट्रात या ५ डिसेंबर २०२४ ला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार सत्तारूढ झाले. त्यांच्याबरोबरच एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे सुद्धा उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.

राजकारणातील एकसंघतेचा आदर्श

या सरकारचे वैशिष्ट्य असे आहे की ज्याप्रमाणे आपण अठरा पगड जातींच्या एकसंघ महाराष्ट्राची कामना करतो, त्याप्रमाणे राजकारणातील संमिश्र प्रवाह, एक दिलाने, एक होऊन या सरकारची स्थापना झालेली आहे.

थेट विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्राचे प्राधान्य

देशाच्या जीडीपीमध्ये महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे. यावर्षी देशात झालेल्या थेट विदेशी गुंतवणुकीमध्ये मोठा हिस्सा एकट्या महाराष्ट्राला मिळाला आहे. हे प्रमाण आलेल्या एकंदरीत एफडीआय मध्ये अर्ध्यापेक्षाही जास्त आहे.

फडणवीस सरकार २.० कडून अपेक्षा

सध्याच्या युगात गतिमानता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असल्याशिवाय विकास होत नाही. हाच विचार डोक्यात ठेवून फडणवीस २.० सरकार काम करेल हा विश्वास आहे.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प

फडणवीस सरकार पहिल्यांदा सत्तेवर आले त्यावेळी मुंबई-अहमदाबाद ‘बुलेट ट्रेनची’ पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे तत्कालीन पंतप्रधान शिंझो आबे यांच्या हस्ते झाली.

पायाभूत प्रकल्पांचा वेगवान विकास

मुंबई मेट्रोच्या उर्वरित टप्प्याला आता वेग येईल. मुंबईत नुकतीच मेट्रो सात च्या भुयारी मार्गाला सुरुवात झाली. त्याचे पुढील टप्पे मुंबईच्या शाश्वत विकासाला कारणीभूत ठरतील.

धारावी पुनर्विकास प्रकल्पाची संधी

मुंबईचा पूर्वीपासून रखडलेला, लालफीतशाहीमध्ये अडकलेला ‘धारावी पुनर्विकास प्रकल्पाला’ अंतिमतः चालना मिळून तो पूर्णत्वास जाण्याची अपेक्षा आहे.

जलयुक्त शिवार आणि ग्रामीण विकास

आधीच्या काळात रखडलेली जलयुक्त शिवार आणि प्रदूषण कमी होण्यासाठी केलेल्या विविध प्रयोजनांची परत जलद गतीने अंमलबजावणी होईल ही अपेक्षा करू या.

स्टार्टअप क्षेत्रातील महाराष्ट्राची आघाडी

देवेंद्र फडणवीस सरकारचे महाराष्ट्राला ‘वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी’ करण्याचे ध्येय आहे. यासाठी स्टार्टअप इंडस्ट्रीकडे लक्ष देण्याची महत्त्वाची गरज आहे.

महाराष्ट्राचे ‘वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी’चे ध्येय

सध्याच्या घडीला महाराष्ट्रात २४,०४४ स्टार्टअप नोंदण्या झाल्या आहेत. यामुळे महाराष्ट्राचे स्थान भारताच्या स्टार्टअप इकोसिस्टममध्ये अग्रस्थानी राहिले आहे.

महाराष्ट्र हे देशाचे महत्त्वाचे ‘ग्रोथ इंजिन’ असल्याने याचा सर्वांगीण विकास महत्त्वाचा आहे. फडणवीस २.० सरकारकडून सर्व क्षेत्रात विकासाचे नवे मापदंड निर्माण होण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्राची आर्थिक, शैक्षणिक, आणि सामाजिक प्रगती देशाच्या विकासासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे.

Related posts

Leave a Comment