१६ वी लोकसभा : अभूतपूर्व निवडणूक

साल २०१४ – महिना एप्रिल आणि मे. भारतासारख्या खंडप्राय देशातील सार्वत्रिक निवडणुका. मागच्या वर्षापर्यंत कुणीही भाकीत केलेला नव्हत की या सर्वार्थाने ऐतिहासिक तर् ठरतीलाच परंतु कित्येक बाबतीत देशाचेच नाव्ये तर् आंतरराष्ट्रीय राजकारणाचे निकष आणि आराखडे पण ठरवायला आणि बदलायला कारणीभूत ठरतील.

दोन महिन्यांपूर्वीच मला स्वतःला श्री. मोदींच्या नेतृत्वा खालील भारतीय जनता पक्षाला घाघावीत यश मिळेल असा अंदाज पूर्णांशाने होता. परंतु ज्या प्रकारे आणि ज्या पद्धतीने ये यश मिळाले, ते पुढील कित्येक महिने देशाच्याच नव्हे तर् जागतिक पटलावर अभ्यासले व चर्चिले जाईल.

सोसाट्याचा वर सुटावा आस नरेंद्र मोदींचा देशभर झंझावाती प्रचार व व्यक्तिमत्व भारतीय जनता पक्षाची पाले मुळे देशभर रुजवायला अशाप्रकारे कारणीभूत ठरले की जे भल्या भल्यांना जमू शकणार नाही. अटलजी आणि अडवाणी या दिग्गज जोडगोळीला सुद्धा ज्या प्रमाणात ही गोष्टं शक्य झाली नाही ति मोदींना शक्य झाली. म्हणूनच मला वाटतेय की श्री. नरेंद्र मोदींची आजपर्यंत ची वाटचाल व व्यक्तिमत्व बघता देशाच्याच नव्हे तर जगाच्या क्षितिजावर एक दैदिप्यमान नेतृत्व प्रस्थापित झाले आहे.

जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशातील (या) १६ व्या लोकसभेच्या सर्वात मोठ्या निवडणुका ठरल्यात. ९ विभिन्न टप्पे, जवळ जवळ ८२ कोटी मतदार, ५४३ मतदारसंघ, सर्वच भव्यदिव्य. आणि विशेष म्हणजे १६ व्या लोकसभेच्या या निवडणुकांमध्ये रखरखीत उन्हाळा असूनही ऐतिहासिक असे ६६.१४ टक्के मतदान झाले. यापूर्वीचा मतदानाचा टक्केवारीचा आकडा ६४ टक्के हा १९८४ मधील होता. तद्वतच १९८४ नंतर प्रथामतच एख्याद्या पक्षाला पूर्णपणे बहुमत मिळाले.

इंदिराजींचा कालखंड सोडल्यास प्रथामतच एवढा मोठा व्यक्तिकेंद्रित प्रचार प्रचार व निवडणूक भारताच्या राजकीय इतिहासात प्रथमच लढवली गेली. णी निवडणूक पूर्णार्थाने pro d anti मोदी अशाप्रकारे लढवली गेली. यामुळे भारतीय संसदीय लोकशाहीची सार्वत्रिक निवडणूक बऱ्याच प्रकारे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीच्या धर्तीवर Referendum on Namo वाटले. अपवाद १९८९ चा, पण त्यावेळीही राजीव गांधींपेक्षा ‘बोफोर्स’ हा निवडणुकीतील मुख्य मुद्दा होता.

या निवडणुकीची दुसरी विशेषता ही होती की भारताच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदा digital media / electronic media यांचा एवढ्या मोठ्या प्रमाणात व खुबीने वापर केला गेला.

भारतीय जनता पक्षाने त्यांच्या पक्ष मुख्यालया मध्ये एक digital operations center च सुरु केले होते. तसेच बंगलोर स्थित काही आय. टी. कंपन्यां द्वारे एक संपूर्ण मिशन आखले गेले. या द्वारे यु ट्यूब व इतरत्र व्हिडीओ अपलोड केले गेलेले. ट्विटर बझ निर्माण केला गेला. फेसबुक फॉलोअर्स द्वारे जनजागृती केली. व्हाटस्अप वर एक सॉफ्टवेअर अपलोड केले गेले. या प्रकारचा ट्रेंड भारतीय राजकारणाने पूर्वी कधीही अनुभवला नव्हता. एसएमएस / कॉल सर्विस आयव्हीआरस द्वारे संदेश प्रसारण केले गेले. छ चे नंबर द्वारे कॉलर ट्युन्स चा प्रसार व प्रचार करून पार्टीचा जनाधार वाढवण्यात आला. गुगल प्ले स्टोअर मध्ये एक अॅप विकसित केला गेला. त्याचे नाव Mobile App Indi २७२+ हे होते. एवढेच नव्हे तर त्रिमितीय परिणाम साधून (३D Hologram) नरेंद्र मोदींच्या एकाच वेळी अनेक ठिकाणी सभा घेण्यात आल्या.

अशाप्रकारे भारतीय जनता पार्टीने डीजिटल  व इलेक्ट्रोनिक मीडियाद्वारे प्रचाराची रणधुमाळी आखली. त्याचे रसरशीत फळ त्यांना मिळालेच.

या निवडणुकीद्वारे आणखीही काही गोष्टी अधोरेखांकित झाल्या, जशा आधी संधी मिळूनही अपयशी ठरलेल्या पक्षांना मतदारांनी पूर्णतया नाकारले.

बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांचा राजद, त्यांच्या बद्दल निकालाआधी भाकीत केले गेले होते की या निवडणुकीद्वारे ते पुनरागमन करतील, हा फोल ठरला. लालूंचा पक्ष फक्त चार जागा जिंकतोय. मागील वेळी त्यांच्याकडे ४ व त्यापूर्वी २४ जागा होत्या. फक्त ३ च वर्षापूर्वी पर्यंत यूपी मध्ये सत्तेत असणाऱ्या मायावतींना तर् खातेही उघडता आले नाही. मुलायमसिंग यादव यांचा एसपी व अजित सिंग यांचा RLD हा सुद्धा चांगलाच पराभूत झालं. एवढेच नव्हे तर् कर्नाटक मध्ये देवेगौडांचा जनता दल (धर्मनिरपेक्ष) अतिशय कमी जागांवर विजीयी होतोय. याचप्रकारे हरियाणामध्ये INLD या राष्ट्रीय लोकदल, पूर्वाश्रमीचे देवीलाल प्रणीत व नंतर ओमप्रकाश चौटालांचा) सफाया झालाय. आसाम मध्ये AGP व काश्मीर मध्ये National Conference पण पराभूत झालीय. आशा प्रकारे पहिल्यांदाच तथाकथित ‘Vote Bank Policies’ व त्यांच्या कर्त्याधर्त्यांचा दारून पराभव झालाय.

त्यानंतर सर्वात महत्वाचे म्हणजे देशाच्या व काँग्रेसच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच काँग्रेसचा असा पराभव झालाय की त्यांना विरोधी पक्षनेते पद मिळणे पण दुरापास्त होतेय. मागील सतत १० वर्षे सत्तेत असणाऱ्या पक्षांना यापेक्षा मोठ्या नामुष्कीचा सामना यापूर्वी कधीही करावा लागला नव्हता.

एकप्रकारे हा गांधी परिवार वादाचा व काँग्रेस पक्षाचा सुद्धा पराभव आहे.

या निवडणुकी द्वारे पुढे येणारा मुद्दा हा आहे की Development Plank (Platform d Good Governance) वर मते मिळवता येतात. ‘सांप्रदायिकता’ सारख्या पोकळ व दांभिक मुद्याला मतदारांनी पूर्णतः अव्हरले. मला बऱ्याचदा वाटायचे की युरोप, मुख्यतः जर्मनी मध्ये ग्रीन पार्टी ज्या प्रकारे मुद्दे आणून निवडणुका लढवते उदा. पर्यावरण इत्यादी अशाप्रकारे भारतातील पक्ष कधी समृद्ध होतील. ते यावेळी मतदारांनी जाणवून दिले आणि सांप्रदायिकता आणि सेक्युलारीझम चा ढग फुटला.

२०१४ ची ही निवडणूक आणखीही एका कारणाने वैशिष्टपूर्ण ठरलीय. जागतिक स्तरावरील सामाजिक कार्यकर्त्या मेघा पाटकर, थोर आयटी तज्ञ नंदन निलेकणी यांचा निवडणुकांच्या राजकारणातील प्रवेश लक्षवेधी ठरला. परंतु त्यांचा प्रभावही विस्मयकारक म्हणावा लागेल. यात योगेंद्र यादव या निवडणूकतज्ञ व प्राध्यापकांचा पराभव पण येतो.

मो. अझरुद्दीन, मो. कैफ, राज्यवर्धन राठोड यांसारखे खेळाडू, तसेच सिनेसृष्टीतील मोठी फौज निवडणुकीच्या रणांगणात उतरलेली होती. परेश रावल, हेमामालिनी, मुनमुन सेन, किरण खेर, नगमा, जयाप्रदा, बाबुल सुप्रीयो, बप्पी लाहिरी ही काही प्रातिनिधिक नावे, त्यातील कित्येक विजयी पण ठरलेत. जनरल व्ही.के. सिंग व चौधरी अजित सिंगांचा पराभव करणारे माजी पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग चांगलेच लक्षात राहतील.

Repercussions of this election

६२ वर्षाच्या भारताच्या संसदीय इतिहासात, या निवडणुकीनंतर प्रागतिक युरोपीय व अमेरिकेमध्ये असणाऱ्या द्विधृवीय पद्धतीनुसार राजकारण व्हायला खूप मोठा आधार आहे. या निवडणुकी मध्ये डाव्या पक्षांचा पूर्ण सफाया झालेला आहे. गम्मत म्हणजे युरोप मध्ये डाव्यांचा ऱ्हास झाल्यानंतर साधारण २५ वर्षांनी भारतात हे झाले. तब्बल दोन दशकांपेक्षा जास्त काल राज्य केलेल्या बंगाल मध्ये त्यांना जेमतेम २ जागा मिळत असल्याने ही गोष्टं अधोरेखांकित होतेय. यापुढील काळात त्यांच्या भूमिकेला धोरणात्मक किमत नसेल. एकेकाळी बंगाल, मुंबई, केरळ, कानपूर तसेच अमरावती, वर्धा असा सर्वदूर त्यांचा प्रसार होता तो पूर्णतः आकुंचित झालाय. डाव्यांचा एकप्रकारे नि:पात झालाय भारतीय राजकारणातून.

ही २०१४ ची यशोगाथा श्री नरेंद्र मोदी यांनी निर्मित केली, दिग्दर्शित केली, म्हणून अब की बार मोदी सरकार व नंतर बार बार मोदी सरकार!

स्वतंत्र नागरिक – १८ ते २६ मे २०१४ पान क्र. १८ वर प्रसिध्द  

Related posts

Leave a Comment