१६ वी लोकसभा : अभूतपूर्व निवडणूक

साल २०१४ – महिना एप्रिल आणि मे. भारतासारख्या खंडप्राय देशातील सार्वत्रिक निवडणुका. मागच्या वर्षापर्यंत कुणीही भाकीत केलेला नव्हत की या सर्वार्थाने ऐतिहासिक तर् ठरतीलाच परंतु कित्येक बाबतीत देशाचेच नाव्ये तर् आंतरराष्ट्रीय राजकारणाचे निकष आणि आराखडे पण ठरवायला आणि बदलायला कारणीभूत ठरतील. दोन महिन्यांपूर्वीच मला स्वतःला श्री. मोदींच्या नेतृत्वा खालील भारतीय जनता पक्षाला घाघावीत यश मिळेल असा अंदाज पूर्णांशाने होता. परंतु ज्या प्रकारे आणि ज्या पद्धतीने ये यश मिळाले, ते पुढील कित्येक महिने देशाच्याच नव्हे तर् जागतिक पटलावर अभ्यासले व चर्चिले जाईल. सोसाट्याचा वर सुटावा आस नरेंद्र मोदींचा देशभर झंझावाती प्रचार…

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने – विधानसभा निवडणुकीचे पूर्वावलोकन

मुळातच लोकसभा निवडणुका वेगळ्या कारणासाठी लढवल्या जातात. त्यामध्ये राष्ट्रीय दृष्टिकोन हा केंद्रस्थानी असतो. म्हणजेच केंद्रातील सरकार देशाचे संरक्षण व देशाचा आर्थिक विकास कसा करणार या व इतर परिणामांद्वारे जनता आपले मत नोंदवते. राज्यामध्ये विधानसभा निवडणुकी दरम्यान मात्र निराळे मुद्दे महत्वाचे ठरू शकतात. अर्थातच प्रस्थापितांच्या विरोधी जनमताचा रेटा (anti-incumbency factor) हा मुद्दा प्रकर्षाने मोठा असतो. आपल्या संघराज्य पद्धतीप्रमाणे लोकसभा निवडणुकां इतकेच विधानसभा निवडणुकांनाही महत्व आहे. लोकसभा निवडणुकीने केंद्रसरकार बनते तर विधानसभा निवडणुकीने राज्यसरकार, अर्थातच परराष्ट्र, संरक्षण, अर्थ, दळणवळण अशी कानी महत्वाची खाती आणि विभाग सोडले तर राज्य सरकारकडे संपूर्णच खाती परंतु…