प्रयोजित भारत-अमेरिका अणुकरार

चाणक्य मंडल परिवार (मासिक), पुणे / डिसेंबर २००६ (वर्षे दुसरे, अंक बारावा) / पान ११ व ३८   सन १९९० च्या सुरवातीस शीतयुद्ध संपले. सोव्हियत युनियनचे विघटन सुरु झाले. पर्यायाने अमेरिका हि एकमेव महासत्ता म्हणून स्थापित झाली. नव्वद च्या दशकामध्ये अमेरिकेची दादागिरी समस्त जगणे अनुभवली. कालांतराने त्यांचे वर्चस्व कमी-अधिक प्रमाणात सर्वांनीच मान्य केले. पर्यायाने भारतानेही शितयुद्धकालीन दुरावा संपवून, जसवंतसिंग परराष्ट्रमंत्री असताना नियोजनबद्ध रीतीने अमेरिकेशी जवळीक निर्माण केली. त्यानंतर पुढे येणाऱ्या प्रत्येक परराष्ट्रमंत्र्याने मुख्यतः सरकारने हा धोरणात्मक बदल अमलात आणला. ‘बदल’ हा शब्द वापरण्याचे कारण हे कि सोव्हियत युनियन अस्तित्वात असताना,…