अमेरिका आणि ब्रिटन या दोन लोकशाही राज्यपद्धती असणाऱ्या देशांमध्ये साधारणतः दोन मुख्य पक्षांमध्येच निवडणुका लढल्या जातात. सुदृढ आणि परिपक्व लोकशाहीचे ते एक लक्षण आहे. इंग्लंडमध्ये हुजूर पक्ष व मजूर पक्ष तसेच अमेरिकेमध्ये रिपब्लीकन पक्ष व डेमोक्रॅटिक पक्ष असे दोन महत्वाचे पक्ष आहेत. इतर अनेक युरोपियन देशांमध्ये साधारणतः अशाच प्रकारची पद्धत आहे. आपल्या लोकशाही राज्यपद्धतीमध्ये आपण इंग्लंड प्रमाणे सांसदीय लोकशाही राबवतो अमेरिकेसारखी अध्यक्षीय पद्धत नव्हे (तेथे राष्ट्राध्यक्षांची निवड प्रत्यक्ष जनतेमार्फत होते.) साहजिकच व्यक्ती तितक्या प्रकृती या उक्ती प्रमाणे आपल्याकडे ढीगभर पक्ष अस्तित्वात होते व आहेत. सांसदीय लोकशाहीमध्ये मुख्यतः “सत्तारूढ पक्ष वा…
