‘झुक् ऽ झुक् ऽऽ झुक् झुक् आगीन गाडी, धुरांच्या च्या रेषा हवेत काढी’ हे बालगीत आपल्या सगळ्यांच्या मनामनात अगदी पूर्णपणे ठसलेले आहे. समस्त मराठी जनांच्या भाव विश्वाची सुरुवात करणाऱ्या अनेक कविता व बालगीतां मध्ये कदाचित हे गीत अग्रस्थानी असेल. तत्समच त्यातील ‘आगीनगाडी’ सुद्धा सर्वांच्या आवडीचा व कुतूहलाचा विषय आहे. एकप्रकारे भारताची भौतिक प्रगती ही रेल्वे च्या बरोबरीने झालेली आहे; अर्थात हा एका वेगळ्या व मोठ्या लेखाचा विषय असू शकतो. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इंग्रजांच्या ज्या काही चांगल्या पाउलखुणा आपल्याला दिसतात, त्या मध्ये ‘रेल्वे’ ही ‘धरोहर’ कदाचित प्रथमस्थानी असेल. माझ्या लहानपणी यवतमाळ…
