इराक युद्ध, सद्दाम हुसैन आणि अमेरिका

३० डिसेंबर २००६ रोजी इराकच्या प्रमाण वेळे नुसार पहाटे माजी अध्यक्ष सद्दाम हुसैन यांना फासावर चढवण्यात आले आणि एक हुकुमशहा काळाच्या पडद्याआड गेला. मानवीय दृष्टिकोनातून या घटनेचे विश्लेषण केल्यानंतर क्लेशदायक बाबी नजरे समोर येतात. त्याच बरोबर आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या परिप्रेक्ष्यातून हीच घटना एक दीर्घ आणि अतिशय गहन विषयवस्तू समोर आणते. पश्चिम आशिया आणि आखाती प्रदेश यातील एक महत्वाचा देश इराक खनिज तेलाने पर्यायाने पेट्रोडॉलरने समृद्ध व संपन्न देश. येथे १९७९ साली तत्कालीन अध्यक्ष अल-ब्रक यांना राजीनामा द्यावयास भाग पाडून सद्दाम हुसेन हे क्रमांक २ चे नेते व तत्कालीन उपाध्यक्ष सत्तारूढ झाले.…