सन १९४९ च्या ऑक्टोबर मध्ये चँग कै शेक यांची राजवट उलथवून चीनमध्ये माओ त्से तुंग यांनी साम्यवादी सरकार स्थापन करून सांस्कृतिक क्रांती घडवून आणली… यानंतरच्या मागील सहा देशाकामध्ये चीनची प्रगती व त्याचा चढता आलेख हा अभ्यासाचा गहन विषय आहे. यामध्ये चीनचा राजनैतिक व लष्करी दबदबा व आर्थिक समृद्धी हे भिन्न अभ्यासाचे विषय असले तरीही ते राष्ट्रीय पुनरुत्थानाच्या नाण्याच्या ते दोन बाजू दर्शवितात. प्रथम त्यांच्या राजनैतिक स्थित्यंतराचे विश्लेषण करू. माओ व त्यांचे पंतप्रधान चौ एन लाय यांनी एकीकडे भारताचे पंतप्रधान पंडित नेहरू यांचे बरोबर पंचशील करार केला, तर दुसरी कडे तिबेटवर…
