तब्बल एक कोटी ऐंशी लाख लोकांना दररोज प्रवास घडवणाऱ्या व सुमारे २० लाख टन माल वाहून नेणाऱ्या भारतीय रेल्वेचे हंगामी अंदाजपत्रक १३ फेब्रुवारी २००९ रोजी संसदेत मांडण्यात आले. यावर्षी निवडणूक होणार असल्या कारणाने हंगामी अंदाजपत्रक सादर झाले. साधारण जून मध्ये सामान्य बजेटपूर्वी दोन दिवस अगोदर रेल्वेचे संपूर्ण अंदाजपत्रक सदर होईल. भारतीय रेल्वेचा पसारा हा प्रचंड मोठा आहे. टी जगातील सर्वात मोठी संघटना, कर्मचारी व अधिकारी यांच्या संख्येच्या दृष्टीनेच ठरते. तद्वतच लांबीच्या दृष्टीने जगातील चौथ्या क्रमांकाची रेल्वे आहे. (पहिली अमेरिकेची, दुसरी रशियन, तिसरी चीनची). सुमारे ६३,३२७ कि.मी. अंतरा मध्ये पसरलेल्या भारतीय…
