१६ मे रोजी निवडणुकांचा निकाल बाहेर आला. त्याच बरोबर निकालाबद्दल आनंद, आश्चर्य, उत्साह, दुःख, राग, रोष याचबरोबर त्याचे मंथन म्हणजे एक प्रकारे चर्वितचर्वण सुरु झाले. अर्थात हा निकाल सर्वार्थाने ऐतिहासिक असाच आहे. त्यामुळे होणारे बदल हे पुढील कित्येक वर्षे भारताचे राजकीय भूगोल व आर्थिक घडी बदलण्यास कारणीभूत ठरतील. भारत हि एक उगवती राजकीय व आर्थिक महासत्ता असल्याने साहजिकच त्याचे वैश्विक परिणाम सुद्धा होतील. साधारणतः आपल्याकडे निवडणुकांमधून मिळणाऱ्या साध्या बहुमाताद्वारे येणारे सरकार ठरत असते. त्यामुळे मतदान आणि मतदार यांचे गुणोत्तर फार महत्वाचे ठरते. अतिशय गमतीचा भाग हा आहे कि आज पर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये मतदानाच्या ५०% मते मिळून कुठेलेही सरकार सत्तासीन होऊ शकले नाही. आणि मतदानाचे प्रमाण पाहता, ५५ ते ६०%, असे म्हणता येईल कि देशातील अर्ध्यापेक्षा जास्त जनता आजपर्यंत कुठल्याही अगदी लोकप्रिय ठरलेल्या आणि अधिकारारूढ असणाऱ्या सरकार व पक्षाच्या मागे नव्हती. अर्थातच हा सर्वच केंद्रीय सरकारच्या संबंधातील आलेख आहे. आताच संपलेल्या निवडणुकांमध्ये झालेल्या मतदानाची टक्केवारी हि मागील कित्येक वर्षे झालेल्या मतदानापेक्षाहि जास्त होती. सन १९८४ मध्ये या पूर्वी ६४% मतदान झालेले होते. तब्बल ३० वर्षांनी हा मतदानाचा आकडा पार झाला. यावर्षी विक्रमी ६६.१४% मतदान झाले. तसेच १९८४ नंतर प्रथमतः एखाद्या पक्षाचे सरकार बहुमताचे अधिकाररूढ झाले. म्हणूनच मतदानाच्या जास्त टक्केवारीचा / उत्साहाचा बहुमाताशी प्रत्यक्ष अर्थाअर्थी संबंध आहे, असे म्हणता येईल. या वर्षी झालेल्या विक्रमी मतदानाद्वारे कित्येक गोष्टी अधोरेखित झाल्यात. विजयी पक्ष व आघाडी बऱ्याच राज्यांमध्ये १००% यशस्वी ठरलीय. गुजरात, राजस्थान हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, गोवा या ठिकाणी NDA/BJP ला सर्वाच्या सर्व जागा मिळाल्यात. याचप्रकारे हे सुद्धा दिस्यून येतेय कि पराभूत पक्ष व आघाडी या वेळी UPA व काँग्रेस कित्येक राज्यांमध्ये खाते सुद्धा उघडू शकली नाही. तसेच BJP/NDA ला आजपर्यंत मिळालेली ह सर्वाधिक आकडेवारी व जागांची संख्या आहे, तर काँग्रेसच्या बाबतीत ती नीचांकी आहे. जी पार्टी / आघाडी गेली १० वर्षे सलग सत्तेवर होती, त्यांच्यापेक्षा BJP/NDA ला उत्तरप्रदेश या एक राज्यातच कितीतरी जास्त जागा प्राप्त करण्यात यश आले. मतदानाच्या जास्त टक्केवारीचा अन्वयार्थ अशा प्रकारे लावता येउ शकतो. आता काही उल्लेखनीय व महत्वाची आकडेवारी बघुयात. उत्तरप्रदेश या एका राज्यातच मतदानाचे प्रमाण मागील वेळेपेक्षा +२६% वाढल्यामुळे तेथे BJP/NDA ला अभूतपूर्व असे यश मिळाले. तद्वतच ३ वर्षापूर्वी तेथे सत्तेत असणाऱ्या BSP ला मागील वेळेपेक्षा (२००९) -७% मतदान कमी झाल्याने एकाही जागा मिळाली नाही. तसेच फक्त -१०% मतदान मागील वेळेपेक्षा (२००९) काम झाल्याने सत्तारूढ समाजवादी पक्षाला फक्त ५ जागा मिळाल्या. तसेच बघितल्यास गेल्या वेळेला BSP ला एकट्या उत्तर प्रदेशात १ कोटी ५१ लाख मतदारांचा पाठींबा होता. यावर्षी तो साधारणतः ९ लाखांनी वाढूनही हि स्थिती झाली (कारण एकूण मतदान जास्त झाले). भाजपला गुजरातमध्ये ६०% मतदारांनी पाठींबा दिल्याने त्यांना शतप्रतिशत यश मिळाले, तर काँग्रेस ला ३३% मतदारांनी तारूनही खाते उघडता आले नाही. याचप्रकारे असेही दिसून आले आहे कि भाजपला प. बंगाल मध्ये १७% मतदान होऊनही फक्त दोन जागा मिळाल्यात तर कॉंग्रेसला अंदाजे ९% मतदान होऊनही चार जागा मिळाल्यात. एवढ्याच मतदानाद्वारे गेल्या वर्षी त्यांना ६ जागा मिळालेल्या होत्या. आणि डाव्या पक्षांना तर भाजपपेक्षाही जास्त मतदान होऊनही दोनच जागा मिळाल्यात. गेल्यावेळी म्हणजे २००९ मध्ये बिहार NDA ला ३८% मतदान झाल्याने प्रचंड बहुमत मिळाले होते. त्यांना ३२ जागा मिळाल्या होत्या, तर UPA ला ३६% मतदान होऊनही कमी जागा मिळाल्या होत्या. त्यामुळेच मतदान / मतदानाचे प्रमाण / मतदानाचे व मतदारांचे गुणोत्तर votting pattern या गोष्टी महत्वाच्या ठरतात. सन २००४ च्या निवडणुकांमध्ये भाजपला १३८ जागा होत्या व अधिकारारूढ झालेल्या UPA मधील मुख्य पक्ष काँग्रेस ला फक्त १४५ जागा होत्या. तरीही स.पा. ३६, आरजेडी २५ व डावे पक्ष यांच्या पाठिंब्याने त्यांची संख्या ३०० पर्यंत पोहोचली. अर्थातच मतदानाच्या टक्केवारी मधील फरक दोन्ही पक्षांमध्ये फार काही नव्हता. एक बोलकी आकडेवारी ये सुद्धा दर्शवते कि काँग्रेस चे २०१४ मध्ये पानिपत व्यायला त्यांना असलेली १९.३% मतदानाची टक्केवारी कारणीभूत आहे. ज्यामुळे त्यांना फक्त ४४ जागा मिळाल्यात. पण त्याच बरोबर असेही सांगता येईल कि यापेक्षाही कमी टक्केवारी म्हणजेच १८.८% असूनही २००९ मध्ये भाजपला ११६ जागा मिळाल्या होत्या. एक अतिशय मात्वाचा भाग म्हणजे त्यावेळी मतदानाचे प्रमाण साधारणतः ४०% एवढे होते. तसेच ते २००४ मध्ये साधारणतः ४५% ते ५०% एवढेच होते. मतदान व मतदानाची टक्केवारी यांचा एकत्रित विचार केल्यास मला वाटते कि २००४ व २००९ मध्ये झालेले मतदान म्हणजे एकप्रकारे passive voting / -ve voting (निष्क्रीय / नकारात्मक), तर आताचे मतदान हे active voting / +voting (सक्रीय / सकारात्मक) या प्रकारचे आहे. अशाच प्रकारे + voting यापूर्वी १९७७, १९८४, १९८९, १९८० साली दिसले होते. तर दुसऱ्या प्रकारचे मतदान १९९१ साली, त्यानंतर साधारणतः १९९८ साली दिसले होते. मिश्र मतदानाचा पॅटर्न हा १९९६, १९९८ (व १९९९ active) साली होता. म्हणूनच यापुढील काळात vote bank यापेक्षा vote banking on किंवा vote buck-up (जास्त मतदानाचे प्रमाण) या संज्ञा महत्वाच्या ठरतील. अर्थातच याचा मार्ग सुशासन व विकासाचा अजेंडा यावरून जातो.
साप्ताहिक ‘स्वतंत्र नागरिक’ (१ ते ७ जुन २०१४) / पान १९ मध्ये प्रसिध्द
