भारतीय रेल्वे : नव्या क्षितिजाकडे

तब्बल एक कोटी ऐंशी लाख लोकांना दररोज प्रवास घडवणाऱ्या व सुमारे २० लाख टन माल वाहून नेणाऱ्या भारतीय रेल्वेचे हंगामी अंदाजपत्रक १३ फेब्रुवारी २००९ रोजी संसदेत मांडण्यात आले. यावर्षी निवडणूक होणार असल्या कारणाने हंगामी अंदाजपत्रक सादर झाले. साधारण जून मध्ये सामान्य बजेटपूर्वी दोन दिवस अगोदर रेल्वेचे संपूर्ण अंदाजपत्रक सदर होईल. भारतीय रेल्वेचा पसारा हा प्रचंड मोठा आहे. टी जगातील सर्वात मोठी संघटना, कर्मचारी व अधिकारी यांच्या संख्येच्या दृष्टीनेच ठरते. तद्वतच लांबीच्या दृष्टीने जगातील चौथ्या क्रमांकाची रेल्वे आहे. (पहिली अमेरिकेची, दुसरी रशियन, तिसरी चीनची). सुमारे ६३,३२७ कि.मी. अंतरा मध्ये पसरलेल्या भारतीय रेल्वे मध्ये ६,९०९ स्थानकांचा अंतर्भाव होतो. यांच्या दरम्यान २०,००० माल डबे, ५०,००० प्रवासी डबे तसेच ८,००० इंजिनांची यातायात होते. या सर्वांवरून भारतीय रेल्वे चा पसारा लक्षात येउ शकेल. स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी वेगवेगळ्या ४२ रेल्वे प्रभागांमध्ये विखुरलेली रेल्वे १९५१ मध्ये एकीकृत केली जाऊन ९ विविध विभागांमध्ये कार्यरत झाली. त्यानंतर २००३ साली काही नवीन विभाग निर्माण केले गेलेत. या सर्वांमध्ये मिळून ६७ उपविभागांचा अंतर्भाव होतो.

मागील ४ ते ५ वर्षाचा लेखाजोखा बघितल्यानंतर असे लक्षात येते की भारतीय रेल्वेला फार मोठा महसूलच फक्त मिळत नसून घसघशीत नफा सुद्धा होतो आहे. यापूर्वी कधीही या प्रमाणे घडले नव्हते. इतर बऱ्याच सरकारी उपक्रमाप्रमाणे रेल्वे सुद्धा तोटा सहन करत होती. परंतु गेल्या काही वर्षामध्ये हा आलेख सारखा बदलतो आहे.

सन २००५-०६ मध्ये रेल्वेला रु. ९,००० कोटी एवढा मोठा नफा जाहीर झाला. २००६-०७ मध्ये रु. १४,००० कोटी, २००७-०८ मध्ये रु. २०,००० कोटी तर् यावर्षी हा आकडा रु. २५,००० कोटी रुपयापर्यंत गेला. अशाच प्रकारे रेल्वेचे अंदाजपत्रक २००५ मधील १३,००० कोटी रुपये पासून यावर्षी ३०,००० कोटी रुपयांपर्यंत वाढले. या वर्षीची नियोजित गुंतवणूक ही ३७,५०० कोटी रुपये एवढी आहे. मागील वर्षा पेक्षा हा आकडा २१% णी जास्त आहे. वाह्तुकीपासून मिळणारे उत्पन्न यावर्षी ९३,१५५ कोटी रुपये एवढे निर्धारित केले गेले आहे. वर्तमान चलनदरा प्रमाणे हा आकडा तब्बल १९.१ अब्ज अमेरिकन डॉलर एवढा होतो.

भारतीय रेल्वेल्च्या काही महत्वाच्या योजनांमध्ये ‘Dedicated Freight Corridor’ चा उल्लेख करावा लागेल. या संकल्पनेचा अर्थ ‘एवढा होतो की, खास मालवाहतुकी कारिता बनविलेला रेल्वेमार्ग. या मध्ये सध्या दोन ‘कॉरीडॉर’ चा समावेश होतो. प्रथम – पूर्वीकॉरीडॉर याची निर्मिती न्हावाशेवा बंदरापासून (जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट) उत्तर प्रदेशातील तुघलकाबाद / दादरी पर्यंत सुरु आहे. या दोन्ही कॉरीडॉरर्सना खुर्जा या उत्तर भारतातील ठिकाणी एकत्र आणल्या जाईल. या संपूर्ण प्रकल्पाकडे लक्ष देण्यासाठी व त्याची सुयोग्य अमलबजावणी होण्यासाठी ‘Dedicated freight corrieor corporation of India Ltd.’ या सरकारी कंपनीची स्थापना केली गेली. ३० ऑक्टोबर २००६ पासून ही कंपनी कार्यरत आहे.

याचप्रमाणे प्रवासी वाहतूक क्षेत्रातही नव-नवीन शिखरे गाठण्यासाठी रेल्वे मध्ये निरनिराळ्या योजना कार्यरत आहेत. मुख्यत्वेकरून कमी दराच्या हवाई वाहतूक कंपन्यांशी स्पर्धा करण्याकरिता राजधानी व शताब्दी एक्सप्रेस सारख्या गाड्यांमध्ये नवीन क्लुप्त्या वापरून प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा पुर्वाण्याची योजना आहे. साधारणपणे या गाड्या ताशी १५० कि.मी. या वेगाने धावतात. भारतासारख्या देशामध्ये हा वेग प्रचंड आहे. तसेच प्रवाशांना प्रवासाच्या वेळी ‘Net connectivity’ म्हणजेच ‘wifi’ सुविधा पुरवण्याचा सुद्धा प्रयत्न सुरु आहे. मुंबई-अहमदाबाद शताब्दी एक्सप्रेस मध्ये या योजनेचा शुभारंभही झाला आहे. ‘पुणे-मुंबई’ इंटरसिटी एक्सप्रेस मध्ये नुकतीच ‘Global Positionary System’ (G.P.S.) कार्यरत करण्यात आली आहे. यामुळे आतील प्रवाशांना एकंदरीत भौगोलिक स्थितीची व इतर तपशिलांची माहिती मिळते. वेगवान गाड्यांसाठी पाच वेगळे मार्ग निर्माण करण्याची सुद्धा एक योजना विचाराधीन आहे. त्यासाठी फ्रेंच तंत्रज्ञांचे विशेष पथक येणार आहे. या साठी २०० अब्ज अमेरिकन डॉलर एवढी तरतूद लागणार आहे. अशाच प्रकारे संपूर्ण देशात सध्या तीन वेगवेगळ्या प्रकारचे रूळ अस्तित्वात असल्याकारणाने होणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी ‘Project Uniguage’ ही योजना सुरु आहे. त्यामुळे रेल्वे वाहतूकीमध्ये एकजिनसीपणा येईल.

प्रवासी रेल्वेचे डबे स्टेनलेस स्टीलचे म्हणजेच Astom ह्या मिश्र धातूचे करण्याची ही एक योजना आहे. त्यामुळे त्यांची आकर्षकता, टिकाऊपणा वाढेल. पेंटसुद्धा ‘पॉली-युरेथीन’ आवरणाच्या स्वरुपात देण्यात येतो. हवा खेळती राहण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. वातानुकुलीत डब्यांमध्ये आंतरराष्ट्रीय मापदंडानुसार असणारेच ‘वाटसहाय्यक शितकांचा’ उपयोग केला जातोय. नुकताच एक नवीन प्रयोग सुरु झालेला आहे. आय.आय.टी. कान्पुरणे बनविलेले निसर्ग सुलभ toilet काही गाड्यांमध्ये वापरात आलेले आहेत.

दीडशे वर्षापेक्षा जास्त इतिहास असलेल्या भारतीय रेल्वेची ही घोडदौड निश्चितच लक्षणीय आहे.

चाणक्य मंडळ परिवार (मासिक), पुणे / मे २००९ / वर्ष पाचवे / अंका पाचवा / पान २१ वर प्रसिध्द.

Related posts

Leave a Comment