बहुआयामी वर्ष २०२४’

वर्ष २०२४ चा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण आढावा घेतल्यास अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डोनाल्ड जे. ट्रम्प यांचे चार वर्षानंतर पुन्हा एकदा निवडून येणे, सीरियामध्ये बशीर अल असद यांची राजवट उलथून पडणे, रशिया युक्रेनचे सुरू असलेले युद्ध, तसेच इसराइल हमास यांचे युद्ध, इराणी राष्ट्रपतींचा अपघातात किंवा घातपातात झालेला मृत्यू, या काही ठळक घडामोडी लक्षात येतात. फक्त भारताच्या दृष्टीने विचार केल्यास श्रीलंकेमध्ये शांततापूर्ण मार्गाने झालेले सत्तांतर आणि त्याचबरोबर बांगलादेशात झालेले सरकार विरोधी बंड आणि त्यामुळे झालेले सत्तांतर, या घटना महत्त्वाच्या आहेत. वर्ष २०२४ ची सर्वात परिणामकारक आंतरराष्ट्रीय घटना ही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक…

भारताचे अस्वस्थ शेजारी देश

आपली लोकशाही व्यवस्था प्रगल्भ आणि सुदृढ असल्याने भारतात राजकीय स्थिरतेचा अनुभव येतो. सध्याचे मोदी सरकार विकासात्मक असल्याने, भारताचा जीडीपी वाढीचा दर जगात सर्वाधिक आहे. यामुळे लवकरच आपण जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असू, असा विश्वास आहे. मोदी सरकारला २०२४ मध्ये जनतेचा, तिसऱ्यांदा ऐतिहासिक कौल मिळाल्याने अर्थव्यवस्था वाढीचा वेग आश्वासक आहे. यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या आर्थिक प्रगतीकडे लागलेले आहे. पण अशातच आपल्या शेजारी देशांमध्ये एक अस्वस्थता आहे – राजकीय तसेच सामाजिक दृष्ट्या. याचमुळे या सर्वांचा एकत्रित परिणाम भारताच्या वाढीवर होणे स्वाभाविक आहे. पाकिस्तान आणि चीन: पारंपरिक विरोधक पाकिस्तान आणि चीन…

महाराष्ट्र देशाचे ‘ग्रोथ इंजिन’

  महाराष्ट्र हे देशातील सर्वात प्रगत राज्यांपैकी एक असून, ‘ग्रोथ इंजिन’ म्हणून ओळखले जाते. २०२४ मध्ये स्थापन झालेल्या महायुती सरकारकडून महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे. या लेखामध्ये महाराष्ट्राच्या आर्थिक, सामाजिक, आणि पायाभूत प्रगतीचा मागोवा घेतला आहे.   महायुती सरकारचे स्थापन देशातील प्रगत राज्य आणि भारताचे महत्त्वाचे ‘ग्रोथ इंजिन’ असणाऱ्या महाराष्ट्रात या ५ डिसेंबर २०२४ ला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार सत्तारूढ झाले. त्यांच्याबरोबरच एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे सुद्धा उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. राजकारणातील एकसंघतेचा आदर्श या सरकारचे वैशिष्ट्य असे आहे की ज्याप्रमाणे आपण अठरा पगड जातींच्या…

अमित कुमार – माय टेक: संगीताची अमिट छाप

अमित कुमार हे नाव भारतीय फिल्म संगीताच्या सुवर्णकाळाशी अतूटपणे जोडले गेले आहे. वडील किशोर कुमार यांच्या प्रभावळीत वाढलेल्या अमित कुमार यांनी स्वतःच्या आवाजाच्या वैशिष्ट्यांनी आणि भावस्पर्शी गाण्यांच्या सादरीकरणाने संगीतप्रेमींच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले. त्यांच्या सांगीतिक प्रवासाला बॉलिवूडच्या ‘गोल्डन एरा’मधील खास ओळख आहे. आज आपण त्यांच्या या अद्वितीय प्रवासाचा आढावा घेणार आहोत, ज्याने भारतीय फिल्म संगीताच्या परंपरेत नवा ठसा उमटवला. गीत-संगीत: शाश्वत सत्य ‘गाणं म्हणजेच गीत आणि बरोबरीने संगीत, हे शाश्वत असतं, आपणच अपूर्ण असतो’ असे मध्यंतरी कुठेतरी वाचनात आले होते. आता अमित कुमार यांच्या गायक म्हणून असणाऱ्या कारकिर्दीचा विचार…

आमची अनन्या – कॅप्टन पी

बदलता प्रवास ‘हम लोग’ आणि ‘ बूनियाद’ या दूरदर्शनवरील सोप ओपेरांचा म्हणजे सिरीयलचा सुरू झालेला प्रवास आज फार वेगळ्या वळणावर येऊन ठेपला आहे. हल्लीच्या डिजिटल मीडियाच्या जमान्यात वेब सिरीज, ‘स्ट्रीमिंग लाईव्ह’ द्वारे प्रसारित होणारे कार्यक्रम ‘टॉक शो’, रियालिटी शो या बरोबरीने विविध भाषिक मालिकांचे स्थान कायम आहे. याचमुळे विविध चॅनेल्स आणि त्यावर चालणारे विविधरंगी कार्यक्रम यांची सदोदित भरमार होत असते. या सर्वांमध्ये दूरदर्शनची राष्ट्रीय वाहिनी आणि त्याचे मराठी अपत्य सह्याद्री वाहिनी आपले अढळ स्थान जनमानसात आजही रुजवून आहेत. याच सह्याद्री वाहिनीवर नवीन मालिका सुरू आहे ‘आमची अनन्या’… अनन्या: मुख्य पात्र…